होमपेज › Kolhapur › दाद्या कवा येणार; दक्षच्या बहिणींची आर्त साद

दाद्या कवा येणार; दक्षच्या बहिणींची आर्त साद

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 12 2018 1:12AM

बुकमार्क करा
राशिवडे : प्रवीण ढोणे

दक्ष सोडून गेला, आई, बाबा, आजोबांच्या डोळ्यांतून अश्रुधारा अजूनही थांबलेल्या नाहीत. अशातच दोन्ही बहिणींचे चिमुरडे हात आजोबाच्या गळ्याला विळखा घालतात. पापा... दाद्या कवा येणार? हे शब्द अजोबाच्या कानात घुसतात, नि  पुन्हा बांध फुटतो, हुंदका फुटतो...तो न थांबणाराच.

आज दिवसभर दक्षच्या घरात सांत्वनासाठी जनसागर लोटला होता. घटनेबाबत हळहळ व्यक्‍त होत होती. आई-बाबांना क्षणाक्षणाला हुंदका येत होता.कालपरवापर्यंत छाताडावर बसून मारणारा दक्षदाद्या  कु.वेदिका व कु.श्रावणी या चिमुकल्या बहिणींना दिसलाच नाही.अंत्यदर्शनाला झालेल्या गर्दीतून दाद्या दिसलाच नाही. सांत्वनासाठी लागलेलीआपुलकीची रीघ पाहून या चिमुकल्या मात्र भेदरूनच गेल्या. चार आणी आठ वर्षांच्या या चिमुकल्यांना काय घडलंय, याची समजही येत नव्हती. त्यांना फद्य इतरंच कळत होतं या सगळ्यांमध्ये आपल्या खोड्या काढणारा दाद्या  दिसत नाही, म्हणून त्या आजोबाला विचारायच्या आणी आजोबाच्या डोळ्यातून पाणी काढत हुंदक्यातूनच निशब्दपणे सांगायचा, तेही त्या चिमुकल्यांना कळत नसायचं, सारंच कसं सुन्‍न, सुन्‍नच. आज सकाळी रक्षाविसर्जन झाले. तो आसपासच असल्याचा भास घरच्यांना, मित्रांना, नातेवाईकांना होत होता.डोळ्यासमोर नटखट छबी व कानावर बोबडा आवाज दूर जात नसल्याचे हळहळून सगळेच सांगत होते. पण दक्ष नाही हे ही तितकेच सत्य होते. यावेळी त्याचे सवंगडी व त्यांचे अस्तित्व फारसे कुणाला जाणविले नसले तरीही दक्षच्या शोधात त्यांचे चिमुकले डोऴे भिरभिरत होते. जणू तो सवंगड्यांना कोल्ह्या, कुत्र्यांपासुन निदान तुम्ही तरी दक्ष राहा, असेच सांगत होता. अवघ्या दहा वर्षांचा दक्ष मात्र आठवणींची साक्षच ठेवून गेला.