दैनिक ‘पुढारी’चा दिवाळी अंक अंबाबाई चरणी अर्पण

Last Updated: Oct 19 2019 12:54AM
Responsive image

Responsive image

कोल्हापूर : प्रतिनिधी 

नि:पक्ष व निर्भीड पत्रकारितेचा 80 वर्षांचा वारसा लाभलेल्या दैनिक ‘पुढारी’ने दर्जेदार दिवाळी अंकाचीही परंपरा अखंड राखली आहे. प्रत्येक वाचकाची आवड-निवड यांचा विचार करून परिपूर्ण दिवाळी अंकाचीही निर्मिती दै. ‘पुढारी’च्या वतीने प्रतिवर्षी केली जाते. यानुसार सन 2019 चा दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार झाला आहे. यंदाचा पहिला दिवाळी अंक  शुक्रवारी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष व  दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण करण्यात आला.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, श्रीपूजक  शरद  मुनिश्वर यांच्यासह सहकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

समाज प्रबोधनाच्या भूमिकेतून दिवाळी अंकाची निर्मिती करण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, उद्योग-व्यापार, पर्यावरण, कला-क्रीडा, आरोग्य, करिअर, मनोरंजन, समाज प्रबोधन अशा प्रत्येक विषयाला स्पर्श करणारा हा दिवाळी अंक आहे. बालचमू, युवक-युवती, स्त्री-पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक या सर्व घटकांसाठी काही ना काही देणारा हा दिवाळी अंक आहे. या अंकाचा लाभ वाचकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.