Wed, Apr 24, 2019 15:52होमपेज › Kolhapur › जिल्हास्तर विद्यार्थी सांस्कृतिक स्पर्धेत पन्हाळा गटाची बाजी

जिल्हास्तर विद्यार्थी सांस्कृतिक स्पर्धेत पन्हाळा गटाची बाजी

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 1:26AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विद्यार्थी सांस्कृतिक स्पर्धेत पन्हाळा गटाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. कागल व गडहिंग्लज गट संयुक्‍तपणे उपविजेता ठरले. विजेत्यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार व प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांच्या हस्ते बक्षिसाने गौरवण्यात आले. 

केशवराव भोसले नाट्यगृहात 11 ते 13 जानेवारी या कालावधीत विद्यार्थी सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या तीनदिवसीय स्पर्धेचे उद्घाटन ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका फेम राणा ऊर्फ हार्दिक जोशी व अंजली ऊर्फ अक्षया देवधर आणि ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम युवा गायक प्रल्हाद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. जि.प. अध्यक्ष शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

तीन दिवसांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळांतील लहान व मोठा अशा दोन गटांतील विद्यार्थ्यांनी समूहगीत, समूहनृत्य, नाट्यीकरण, कथाकथन, प्रश्‍नमंजुषा अशा विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले. शनिवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्यांना बक्षिसाने गौरवण्यात आले. 

निकाल असा : लहान गट :  समूहगीत : विद्यामंदिर गोरंबे, ता. कागल (प्रथम), विद्यामंदिर शिनोळी खुर्द, ता. चंदगड (द्वितीय), विद्यामंदिर जांभाळ नंबर 1, ता. शिरोळ (तृतीय).
समूहनृत्य : विद्यामंदिर कोतोली, ता. पन्हाळा (प्रथम), कन्या किणी विद्यामंदिर, ता. हातकणंगले (द्वितीय), विद्यामंदिर लहान बारवे, ता. भुदरगड (तृतीय).
नाट्यीकरण : विद्यामंदिर दुंडगे, ता. गडहिंग्लज (प्रथम), विद्यामंदिर आसुर्ले, ता. पन्हाळा (द्वितीय), विद्यामंदिर सरनोबतवाडी, ता. करवीर (तृतीय).
कथाकथन : विद्यामंदिर ऐरेवाडी, ता. राधानगरी (प्रथम), विद्यामंदिर शिरोळ (द्वितीय), विद्यामंदिर उर्दू नेसरी, ता. गडहिंग्लज (तृतीय).
प्रश्‍नमंजुषा : केंद्रशाळा नागणवाडी, ता. चंदगड (प्रथम), कन्या विद्यामंदिर तुरंबे, ता. राधानगरी (द्वितीय), विद्यामंदिर व्हन्‍नाळी, ता. कागल (तृतीय). 
मोठा गट : समूहगीत : विद्यामंदिर कासारी, ता. कागल (प्रथम), विद्यामंदिर लहान बारवे, ता. भुदरगड (द्वितीय), विद्यामंदिर बागिलगे, ता. चंदगड (तृतीय).
समूहनृत्य : विद्यामंदिर हरपवडे, ता. पन्हाळा (प्रथम), विद्यामंदिर म्हाळुंगे, ता. करवीर (द्वितीय), विद्यामंदिर कपिलेश्‍वर, ता. राधानगरी (तृतीय).
नाट्यीकरण : विद्यामंदिर करंबळी, ता. गडहिंग्लज (प्रथम), विद्यामंदिर भाटीवडे, ता. भुदरगड (द्वितीय), विद्यामंदिर पोहाळवाडी, ता. पन्हाळा (तृतीय).
कथाकथन : विद्यामंदिर देवर्डे, ता. आजरा (प्रथम), विद्यामंदिर चन्‍नेकुपी, ता. गडहिंग्लज (द्वितीय), विद्यामंदिर पुनाळ, ता. पन्हाळा (तृतीय).
प्रश्‍नमंजुषा : विद्यामंदिर भडगाव, ता. कागल (प्रथम), विद्यामंदिर पोहाळवाडी (द्वितीय), विद्यामंदिर कुमरी (तृतीय).