Sat, Apr 20, 2019 10:15होमपेज › Kolhapur › शाहूपुरीत जागा वादातून पाच जणांना मारहाण

शाहूपुरीत जागा वादातून पाच जणांना मारहाण

Published On: Jan 11 2018 1:06AM | Last Updated: Jan 11 2018 12:31AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

जागेचा ताबा घेण्यावरून शाहूपुरी व्यापार पेठेत पाच जणांना मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. यामध्ये पंकज प्रकाश दोशी (वय 41), तुषार राजेंद्र दोशी (35), प्रशांत प्रफुल्‍ल दोशी (38), अभय उल्हास दोशी (39), प्रितेश प्रकाश दोशी (39) जखमी झाले. मारहाणप्रकरणी रात्री उशिरा शाहूपुरी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.

जखमी दोशी बंधूंनी पोलिसांना दिलेली माहिती अशी, शाहूपुरी व्यापारी पेठेतील जागा आशा दोशी व प्रभा दोशी यांनी 1995 साली घेतली होती. जागेबाबत दोशी आणि आंतरभारती विद्यालय यांच्यात न्यायलयीन वाद होता. या जागेचा ताबा घेण्यासाठी दोशी बंधू मंगळवारी गेले होते. मंगळवारी (दि. 9) न्यायालयामार्फत पंचनामा करून जागेवर नोटीस लावली. तसेच न्यायालयीन कर्मचार्‍यांमार्फत ताबा मिळवला. 

बुधवारी सकाळी दोशी बंधू या ठिकाणी आले असता, अशोक पांडुरंग जाधव आणि त्यांचा मुलगा अमित जाधव यांच्यासोबत जागेचा ताबा घेण्यावर वाद झाला. या वादातून चिडून अशोक जाधव आणि सहकार्‍यांनी दोशी यांना मारहाण केली. शाहूपुरी व्यापारी पेठेत भर रस्त्यावर हा प्रकार सुरू असल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  याप्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.