Fri, Apr 26, 2019 17:35होमपेज › Kolhapur › मास्टरमाईंडसह चौघे ताब्यात

मास्टरमाईंडसह चौघे ताब्यात

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 05 2018 12:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी


ताराराणी चौक परिसरात इस्टेट एजंटावर हल्ला करून झालेल्या लुटीच्या मास्टरमाईंडसह चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी यातील एकाला घटनास्थळी नेऊन चौकशी करण्यात आली. लुटीतील रकमेची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून झाला असून, ती पुन्हा मिळविण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस सूत्रांनी सांगितले. 

दोघा वृद्ध इस्टेट एजंटांच्या डोळ्यावर मिरचीपूड फेकून, तसेच कोयत्याने वार करून सुमारे 17 लाख 19 हजारांची रोकड हातोहात लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि. 2) घडली होती. ताराराणी चौकात भरदुपारी हा प्रकार घडला होता. 

या लुटीचा म्होरक्या गेले काही महिने सुरू असलेल्या जागा व्यवहारात सर्किय होता. 20 लाखांची रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती त्याने साथीदारांना दिली. यानंतर तिघा साथीदारांनी ताराराणी चौक परिसरात दोघा एजंटांना लुटले. यानंतर चोरटे उचगावमार्गे पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे निष्पन्न झाले होते.
याप्रकरणी म्होरक्या, राजारामपुरीतील एकासह करवीर तालुक्यातील दोघे अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले.