Thu, Jun 20, 2019 01:40होमपेज › Kolhapur › लोकसहभागातून मनपाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही...

लोकसहभागातून मनपाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही...

Published On: Jan 12 2018 1:52AM | Last Updated: Jan 11 2018 11:46PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रवीण मस्के

लोकसहभागातून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्राथमिक शिक्षण समितीने हाती घेतला आहे. यामुळे विद्यार्थी सुरक्षेबरोबर शाळा परिसरातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये पटसंख्या घटत चालली आहे, दर्जा सुमार आहे, अशी ओरड केली जाते. याला छेद देत महापालिका शाळा यातून उभारी घेत पुढे येत आहेत. यासाठी निश्‍चित कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापर्यंत दहा शाळा मॉडेल स्कूल बनविण्यात येणार असून त्यासाठी मनपाच्या अर्थसंकल्पनात स्वतंत्र बजेट हेडखाली 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

महापालिकेच्या शहरात 59 शाळा असून सुमारे 9825 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मनपा शाळांमध्ये ई-लर्निंगपासून अद्यावत आधुनिक गोष्टी विद्यार्थ्यांना मिळवून दिल्या जात आहेत. एका शाळा आयएसो मानांकन व एका शाळेची आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी मानांकन झाले आहे. दहा शाळा मॉडेल स्कूल म्हणून तयार केल्या जाणार आहे. या शाळांचे इतर शाळांनी अनुकरण करावे यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थी सुरक्षितता व शिस्तबद्धता यासाठी लोकसहभागातून जाधववाडी येथील प्रिन्स शिवाजी विद्यालयात सीसीटीव्ही बसविण्यात आला आहे. उर्वरित शाळांमध्ये ही यंत्रणा बसविण्यासाठी स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्‍तींना भेटून आवाहन केले जाणार आहे.