कोल्हापूर ब्रेकिंग : सीपीआर कोरोना कक्षातील संशयित ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Last Updated: Mar 30 2020 10:27AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील कोरोना कक्षामध्ये ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्या रुग्णाला उपचारासाठी संशयित म्हणून कोरोना कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तथापि त्यांचा अहवाल अजून प्रलंबित असल्याची माहिती सीपीआरमधील अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली. दरम्यान, मृत रुग्ण हातकणंगले तालुक्यातील असून त्याचे वय ६५ आहे. त्यांना सर्दी, खोकल आणि श्वसनाचा त्रास होता. 

दरम्यान, कोल्हापुरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. मंगळवार पेठ परिसरातील भक्तिपूजा नगरमध्ये आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या 45 वर्षीय महिला नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झाले. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीनवर गेली आहे. 

दरम्यान, 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 39 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.जिल्ह्यात गुरुवारी (दि. 26) कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले. कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसरातील भक्तिपूजा नगरमधील एका 37 वर्षीय तरुणाला तसेच पेठवडगाव येथील एका तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. पेठवडगाव येथील युवतीवर मिरज येथे, तर भक्तिपूजा नगरमधील तरुणावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.articleId: "185584", img: "Article image URL", tags: " corona, maharashtra, kolhapur, CPR, pudhari news ",


पुणे : गेल्या पाच महिन्यांपासून पगार थकल्याने नवले हॉस्पिटलच्या परिचरिकासह कर्मचारी संपावर


काश्मीर मुद्यावरून गरळ ओकणाऱ्या माजी पंतप्रधानांची मुलांसह त्यांच्याच पक्षातून हकालपट्टी!


सांगली : वारणावतीत गव्यांचा, तर अंबाईवाडीत बिबट्यांचा मुक्तसंचार!


कोल्हापुरात आणखी ३ कोरोनाग्रस्तांची भर 


ओटीटीवर प्रदर्शित होणार पहिला मराठी चित्रपट!


अखेर ठरलं! जयललितांच्या अब्जावधीच्या संपत्तीचे 'हे' असणार वारसदार


इंग्लंडमधील 'बायो सेक्युअर' कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजची संमती!


पुणे : पॅरोल रजेवर सुटलेल्या कैद्याच्या स्वागत रॅलीत पोलिसच सहभागी!


महाराष्ट्र पोलिसांना ‘वंदे मातरम’द्वारे मानाचा मुजरा (Video)


सुरक्षा दलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खातमा