Tue, Sep 17, 2019 22:03होमपेज › Kolhapur › शिरोळचे कॉन्स्टेबल भुजिंगा कांबळे निलंबित

शिरोळचे कॉन्स्टेबल भुजिंगा कांबळे निलंबित

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 1:20AM

बुकमार्क करा

शिरोळ : प्रतिनिधी

येथे राजाराम माने यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले शिरोळ पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल भुजिंगा कांबळे याला गुरुवारी सायंकाळी निलंबित करण्यात आले,  तर पोलिस निरिक्षक उदय डुबल यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली.

मंगळवारी शिरोळ येथील युवक राजाराम माने यांचा मृत्यू झाल्यानंतर माने कुटुंबीयासह ग्रामस्थांनी शिरोळ पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. मृत्यूस कारणीभूत असणार्‍यांवर कारवाईसाठी दोनवेळा मोर्चा काढला होता. या घटनेस जबाबदार असणारे पो.कॉ. भुजिंगा कांबळे व शिंदे नामक पोलिस कर्मचारी यांचे नाव फिर्यादी मधून वगळण्यात आले. या गुन्ह्यात डीवायएसपी  त्या  पोलिस कर्मचार्‍यास पाठीशी घालत आहेत, असा आरोप करीत ग्रामस्थ व रमेश सरवदे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली होती. अखेर पुरवणी फिर्यादीमध्ये संशयित पोलिसांची नावे घेतल्यानंतर वातावरण शांत झाले. जिल्हा पोलिसप्रमुखांना ग्रामस्थांच्या वतीने आमदार उल्हास पाटील यांनी निवेदन दिले होते. त्या अणुषंगाने पोलिसांनी पाचपैकी चार आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली होती. यामध्ये कॉन्स्टेबल  कांबळे याचे  निलंबन केले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी उदय डुबल यांचीही कोल्हापूर कंट्रोल रूम येथे बदली केली.