Wed, May 22, 2019 16:18होमपेज › Kolhapur › युवक काँग्रेसने ठोकले विद्युत विभागाला टाळे 

युवक काँग्रेसने ठोकले विद्युत विभागाला टाळे 

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 13 2018 12:27AM

बुकमार्क करा
इचलकरंजी : वार्ताहर

इचलकरंजी शहरातील नादुरुस्त पथदिव्यांच्या संदर्भात आंदोलन छेडूनही नगरपरिषदेकडून दुर्लक्ष झाल्याने इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने विद्युत विभागाला टाळे ठोकण्यात आले. पथदिवे तातडीने दुरुस्त न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

शहरातील बहुतांशी भागातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे  निम्म्याहून अधिक शहर अंधारात आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने नागरिकांची विशेषत: महिलावर्गाला ये-जा करणे मुश्किलीचे बनले आहे. यासंदर्भात इचलकरंजी विधानसभा युवक काँग्रेसने चार दिवसांपूर्वी निवेदन सादर केले होते. मात्र, याबाबत कोणतीच हालचाल झाली नसल्यामुळे आज आंदोलन करण्यात आले. नगरसेवक राजू बोंद्रे, पै. अमृत भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी विद्युत विभागाला टाळे ठोकले. या आंदोलनात अनिस म्हालदार, अवधूत पाटील, शहाबाज मुक्केरी, शाहरूख सनदी, उस्मान जमादार, राजू मुजावर, दीपक सागावकर, दीपक पाटील, राजदीप सणगर, अक्षय कोतमिरे, वासिम बागवान, अक्षय उपाध्ये, वैभव आवळकर, इब्राहिम मुल्ला आदींनी सहभाग घेतला होता.