Thu, Sep 20, 2018 18:03होमपेज › Kolhapur › काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस कोल्‍हापुरातून सुरुवात(Video)

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस कोल्‍हापुरातून सुरुवात(Video)

Published On: Aug 31 2018 12:28PM | Last Updated: Aug 31 2018 1:15PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन 

भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. कोल्‍हापुरातील कावळा नाका येथून आज सकाळी (३१ ऑगस्‍ट) या संघर्ष यात्रेस सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्‍हाण, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज पाटील, पी.एन. पाटील आदी नेते या यात्रेत सहभागी झाले आहेत. 

कोल्‍हापुरातून कावळा नाका येथून संघर्ष यात्रा सुरु झाली आहे. तर केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू आहे. यावेळी काॅंग्रेसचे नेते, कार्यकर्ते उपस्थित आहेत. 

कोल्‍हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहात काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यावेळी उपस्थित नेते.

सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते.