Wed, May 22, 2019 21:08होमपेज › Kolhapur › काँग्रेस आघाडीचा प्रचार प्रारंभही कोल्हापुरातूनच

काँग्रेस आघाडीचा प्रचार प्रारंभही कोल्हापुरातूनच

Published On: Mar 15 2019 1:54AM | Last Updated: Mar 15 2019 1:54AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातूनच करण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने घेतला आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची सभा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रियांका गांधी व खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती आ. हसन मुश्रीफ यांनी दिली.

युतीपाठोपाठ आता काँग्रस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा प्रचाराचा नारळ कोल्हापुरातून फुटणार आहे. युतीची सभा झाल्यानंतर तीन ते चार दिवसांत ही सभा होईल. महाराष्ट्रातील सर्वात मोठी सभा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रियांका यांच्याशी खा. पवार व सुप्रिया सुळे चर्चा करणार आहेत. या सभेला दोन्ही काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित राहतील, असेही आ. मुश्रीफ यांनी सांगितले.