Wed, Feb 20, 2019 02:35होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : महापौरपदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे 

कोल्हापूर : महापौरपदासाठी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे 

Published On: Dec 18 2017 4:51PM | Last Updated: Dec 18 2017 4:51PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूर महानगरपालिका महापौरपदी काँग्रेसकडून स्वाती येवलुजे तर उपमहापौर पदी राष्ट्रवादीच्या सुनील पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

महापौरपद सध्या ओबीसी महिलासाठी राखीव असून, पहिल्या वर्षी काँग्रेस, तर यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापौरपद आहे. यानुसार राष्ट्रवादीच्या फरास महापौर झाल्या होत्या. फरास यांनी मुदत संपल्याने 12 डिसेंबरला महापौरपदाचा राजीनामा दिला होता. तर उपमहापौर अर्जुन माने यांनीही राजीनामा दिला होता. 

काँगे्रसचे नेते आ. सतेज पाटील यांनी महापौरपदासाठी रविवारी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन मते जाणून घेतली होती. महापौर-उपमहापौर पदाच्या शर्यतीत चौघेजण होते.