Sun, Mar 24, 2019 12:37होमपेज › Kolhapur › संगणकीकृत सात-बारासाठी ऑनलाईन जागरण!

संगणकीकृत सात-बारासाठी ऑनलाईन जागरण!

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 11:22PMकौलव : प्रतिनिधी

राज्य शासनाने 1 मेपासून महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर ऑनलाईन सात-बारा देण्याची घोषणा केल्यामुळे महसूल खात्याची धावपळ उडाली आहे. परिणामी, सात-बाराच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील तलाठ्यांना रात्रभर जागरण करावे लागत आहे. त्यामुळे तहसील कचेर्‍यांतून ‘जागते रहो’ची परिस्थिती आहे.

शेतकर्‍यांचा सात-बारा संगणकीकृत (ऑनलाईन) करण्यासाठी गेली दहा-बारा वर्षे प्रयत्न चालू आहेत. गेल्या पाच वर्षांत या मोहिमेला गती आली आहे. मात्र, तांत्रिक त्रुटींमुळे तलाठी मेटाकुटीला आले आहेत.संगणकीकृत सात-बारा उतार्‍यात जमीन कसणार्‍या शेतकर्‍याचे नाव कूळ म्हणून दिसत नाही, हा मुद्दा कमालीचा वादग्रस्त ठरला आहे.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र दिनादिवशी संगणकीकृत सात-बारा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महसूलची यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागली आहे.

ज्जावरील दैनंदिन कामकाज करत संगणकीकरण करताना नाकीनऊ आले आहे.जिल्ह्यातील तलाठी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी जाऊन चक्क रात्रपाळीने उतारे दुरुस्त करत आहेत. अगदी पहाटेपर्यंत जागरण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. तलाठ्यांना शंभर टक्के तपासणी करावी लागते. तर मंडल अधिकारी व नायब तहसीलदारांनी अनुक्रमे तीस व दहा टक्के उतारे तपासणे बंधनकारक आहे. तसेच तहसीलदार व प्रांतांनी अनुक्रमे पाच व तीन टक्के, तर जिल्हाधिकार्‍यांद्वारे एक टक्का उतारे तपासले जाणार आहेत.संगणकीकरणाला खंडित वीज व इंटरनेटचा फटका बसत आहे. जलदगतीने काम पूर्ण करण्याचा दबाव असल्याने अनेकदा चुका होण्याचाही धोका आहे. महाराष्ट्र दिनापासून सर्वच उतार्‍यांचे संगणकीकरण करायचे असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील महसूल यंत्रणाच रात्रंदिवस कामाला लागली आहे.