Sun, May 26, 2019 12:38होमपेज › Kolhapur › राहीला राज्य सरकारकडून ५० लाखांचे पारितोषिक

राहीला राज्य सरकारकडून ५० लाखांचे पारितोषिक

Published On: Aug 22 2018 9:46PM | Last Updated: Aug 22 2018 11:03PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

आशियाई क्रीडा स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक मिळवून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या शाहुनगरी कोल्हापूरच्या राही सरनोबतला घवघवीत ५० लाखांचे बक्षीस राज्य सरकारने जाहीर केले. 

जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी राही सरनोबतने सुवर्णवेध साधत शाहुनगरी कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. राहीने २५ मीटर पिस्तुल प्रकारात भारताला चौथे सुवर्ण पदक मिळवून देत आशियाई शुटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी पहिली भारतीय होण्याचा मान मिळवला.  

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. सुवर्णपदक विजेत्यांना ५० लाख, रौप्य पदक विजेत्यांना २५ आणि कांस्य पदक विजेत्यांना २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.