Sun, Nov 18, 2018 17:43होमपेज › Kolhapur › हुपरी नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवकपदासाठी १२० अर्ज

हुपरी नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवकपदासाठी १२० अर्ज

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

हुपरी : वार्ताहर 

हुपरी नगरपालिका निवडणुकीत आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 130 अर्ज दाखल झाले. नगराध्यक्ष पदासाठी 10 अर्ज   इतके तर नगरसेवक पदासाठी120   इतके अर्ज दाखल झाले छाननी 25 रोजी आहे. निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी तानाजी नरळे, तहसीलदार वैशाली राजमाने यांनी काम पाहिले. 

नगराध्यक्षपदासाठी भाजप मधून जयश्री महावीर गाठ, शिवसेनेतून विमल मुरलीधर जाधव, ताराराणी आघाडीतून सीमा प्रकाश जाधव, श्री अंबाबाई आघाडीतून गीतांजली पाटील आणि राष्ट्रवादीतून दीपाली बाळासाहेब शिंदे, सुजाता अनिल गाठ, नंदिनी अशोक खाडे, कल्पना सयाजी पाटील या आठ जनाचे अर्ज दाखल आहेत तर नगरसेवक पदासाठी प्रभाग 7 मध्ये सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. 
ही निवडणूक पंचरंगी होण्याची शक्यता आहे. प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज प्रभाग 1)12     प्रभाग 2)10 प्रभाग3) 13प्रभाग4) 8प्रभाग 5)13 प्रभाग 6)13 प्रभाग 7)23 प्रभाग 8)12 प्रभाग 9)16.