Thu, Jun 27, 2019 00:00होमपेज › Kolhapur › सीएचबी प्राध्यापकांचे प्रलंबित मागण्यांसाठी पकोडा भेट आंदोलन

सीएचबी प्राध्यापकांचे प्रलंबित मागण्यांसाठी पकोडा भेट आंदोलन

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 03 2018 11:24PMकोल्हापूर : प्रतिनिधी

सी.एच.बी. प्राध्यापक संघटनेच्या वतीने प्रलंबित विविध मागण्यांसाठी शनिवारी उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर पकोडा भेट आंदोलन करण्यात आले. यावेळी प्राध्यापकांनी नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणाची घोषणाबाजी करीत निषेध केला. मागण्यांचे निवेदन उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयातील प्रशासनाधिकारी डॉ. डी. पी. माने यांना देण्यात आले.
21व्या शतकाकडे वाटचाल करीत आहे. देशाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक क्षेत्राचा मोलाचा वाटा असताना या क्षेत्रात अध्यापन करणार्‍या प्राध्यापकांना शैक्षणिक वर्षाच्या शेवटी 50 हजार रुपये मानधन म्हणून दिले जाते. हे मानधन देऊन एका उच्चशिक्षित नवोदित प्राध्यापकांचा शासन अपमान करीत आहे. काही ठिकाणी किमान वेतन कायद्याच्या तरतुदीइतके वेतन दिले जात नाही. तासिका तत्त्वावर काम करणार्‍या प्राध्यापकांचे मानधनासह अन्य प्रश्‍नाचा शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी केली आहे. 

आंदोलनात राज्य संघटक गिरीश फोंडे, प्रा. सुनील भोसले, प्रा. बबन पाटोळे, प्रा.अविनाश पाटील, प्रा.अमोल महापुरे, प्रा.रोहित बारसिंग यांच्यासह सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील प्राध्यापक सहभागी झाले होते.