Thu, Jul 18, 2019 04:45होमपेज › Kolhapur › आयएएस, आयपीएस ट्रेनिंग सेंटर सुरू करणार 

आयएएस, आयपीएस ट्रेनिंग सेंटर सुरू करणार 

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:51AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

चाटे शिक्षण समूह हा विद्यार्थी व पालकांच्या सेवेसाठी सदैव बांधील राहिला आहे. गेली 21 वर्षे पालक आणि समाजातील विविध घटकांनी चाटे शिक्षण समूहाला सहकार्य व बळ दिले आहे. त्यावरच चाटे शिक्षण समूह शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी घोडदौड करत आहे. भविष्यात आयएएस, आयपीएस ट्रेनिंग सेंटर सुरू करू. तसेच ‘केजी टू पिजी’ ही संकल्पना सत्यात आणण्यासाठी कात्यायनी परिसराची निवड केली आहे, असे प्रतिपादन चाटे शिक्षण समूहाचे कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी केले. 

चाटे स्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे नवीन वास्तूमध्ये स्थलांतर शुक्रवारी झाले.नूतन वास्तू स्थलांतर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वास्तूचे उद्घाटन दैनिक ‘पुढारी’चे सहायक सरव्यवस्थापक (अ‍ॅडमीन) राजेंद्र मांडवकर यांच्या हस्ते झाले. 21 वर्षे पालकांची साथ, सामाजातील अनेक घटकांनी केले. त्यांचे सहकार्य यासाठी मोलाचे ठरले. गुणवत्ता असून पैशा भावी गरीब कुटुंबांतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. दैनिक ‘पुढारी’ने चाटे शिक्षण समूहाला विशेष सहकार्य दिले आहे. चाटे स्कूलच्या या कॅम्पसमध्ये ‘संतनगरी’ स्थापन केली जाणार आहे. चाटे शिक्षण समूह आणि ‘पुढारी’चे वेगळे नाते असून, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांंनी प्रोत्साहन दिल्याचेही प्रा. डॉ. खराटे यांनी सांगितले.सहायक सरव्यवस्थापक (अ‍ॅडमीन) राजेंद्र मांडवकर म्हणाले,  दर्जा व गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला. मोठी स्वप्ने पाहणे आणि प्रत्यक्षात उतरविणे हे चाटे शिक्षण समूहाकडूनच शिकावे, असेही त्यांनी 
सांगितले. 

सौ.डॉ.राजश्री खराटे, शाहूपुरी शाखाप्रमुख लहूकुमार थोरात, संभाजीनगर शाखाप्रमुख श्रीधर कुलकर्णी, प्राचार्य प्रशांत देसाई, मदन नागोसे, भारत भोलसे, संतोष पाटील, बी. एस. वडगावे, मुख्यकार्यकारी अधिकारी एस. जे. पाटील, सर्जेराव राऊत, मार्केटिंग विभागप्रमुख शीतल भंडारी, आर्किटेक संभाजी पाटील, कॉन्ट्रॉक्टर  आनंदा पाटील, प्रा सौ. प्रज्ञा गिरी, अशोक साबळे, महेंद्र परमार,गजानन कुलकर्णी, दत्तात्रय चाटे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.