Sun, Jul 12, 2020 21:36होमपेज › Kolhapur › नगरसेवक दिंडोर्लेसह 6 जणांवर गुन्हा दाखल

नगरसेवक दिंडोर्लेसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कौटुंबिक वादातून अ‍ॅड. राममोहन मोहन खारकर (वय 32, रा. अमराई शाहूनगर, गोडोली, जि. सातारा) यांंना लाथा-बुक्यांसह दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी नगरसेवक राजू दिंडोर्ले, त्याचा भाऊ व अन्य सहा जणांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरापर्यंत संशयितांना अटक झाली नव्हती.

दिंडोर्ले, त्याचा भाऊ, जखमीचे सासरे अरुण विष्णुपंत हराळे, मेहुणा अक्षय अरुण हराळे, पत्नी स्वप्ना ऊर्फ श्रीया राममोहन खारकर, चुलत मेव्हणा अमित हराळे (रा. सर्व. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दि. 11 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री ही घटना घडली होती.

सातारा येथील वकील व्यावसायिक राममोहन व स्वप्ना पती-पत्नी आहेत. उभयतांत मतभेद  झाल्याने स्वप्ना सप्टेंबरमध्ये दोन वर्षांच्या मुलीसह कोल्हापूरला माहेरी आल्या आहेत. मुलगी इरा हिला भेटण्यासाठी अ‍ॅड. राममोहन दि. 11 नोव्हेंबरला साने गुरुजी वसाहतीमध्ये आले होते. यावेळी त्यांच्यात जोरात हमरी-तुमरी झाली. वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. हराळे यांच्या शेजारील नगरसेवक दिंडोर्ले, त्याचा भाऊ, सासरे, पत्नी व मेव्हण्यांनी संगनमत करून लाथ्या-बुक्क्यांनी, दांडक्यांनी मारहाण केल्याचे जखमीने फिर्यादीत म्हटले आहे.

मारहाणीनंतर खामकर सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले. प्रकृती सुधारल्यानंतर सातारा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली. शनिवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा वर्ग झाला, असे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी सांगितले. संशयितांना लवकर अटक केली जाईल, असे ते म्हणाले.