Tue, Jul 23, 2019 17:10होमपेज › Kolhapur › कसबा बावडा कुणाची जहागिर नाही : पालकमंत्री

'दादागिरीचे दिवस संपले; भीती दाखवण्याचे कारण नाही'

Published On: Mar 12 2018 1:30AM | Last Updated: Mar 12 2018 12:50PMकसबा बावडा : प्रतिनिधी

कसबा बावडा कोणाची जहागिर नाही, ज्याला जिकडे जायचे आहे तो तिकडे जाऊ शकतो, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. येथील लाईन बाजार चौकात आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ना. पाटील म्हणाले, अरे म्हणणार्‍याला का रे म्हणणारा आला की, अरे म्हणणारा पळून जातो. दादागिरी तोपर्यंत चालते जोपर्यंत कोण उलट बोलत नाही. दादागिरीचे दिवस आता संपले. केंद्रात, राज्यासह 23 राज्यांत भाजप सरकार आहे. त्यामुळे कुणी भीती दाखवण्याचे कारण नाही.

कसबा बावडा, लाईन बाजार परिसरातील लोकांमध्ये भीती आहे. ते काय म्हणतील? आता परिस्थिती बदलली आहे. भीती तुमच्या घरी ठेवा, घरातल्यांना दाखवा. लोकांनी आजच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हे दाखवून दिले आहे, असेही ना. पाटील म्हणाले. महिलांनी स्वावलंबी व्हावे, यासाठी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. यावेळी विशेष कर्तृत्ववान महिला, मुलींचा सन्मान करण्यात आला. हॉकी खेळाडू सिद्धी संदीप जाधव हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, मोहन गोंजारे, अमर साठे यांना भाजपची विविध पदे देऊन सत्कार करण्यात आला.

सायंकाळी लाईन बाजार चौकात झालेल्या कार्यक्रमातील प्रास्ताविकात चंद्रकांत घाटगे यांनी  केले. त्यांनी कसबा बावडा, लाईन बाजार येथील कचर्‍याची समस्या मांडली. बफर झोनही रद्द करण्याबाबत मागणी करण्यात आली. कार्यक्रमास महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.