Thu, Mar 21, 2019 11:47होमपेज › Kolhapur › डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची प्रा. नलगे यांना डी. लिट. पदवी

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची प्रा. नलगे यांना डी. लिट. पदवी

Published On: Apr 06 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 1:01AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

प्रसिद्ध लेखक प्रा. चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, मुंबई यांनी डी.लिट. ही महत्त्वाची पदवी नुकतीच प्रदान केली. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, माजी राज्यपाल त्रिपुरा व बिहार यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. विजय पाटील उपकुलगुरू डॉ. शिरीष पाटील यांच्या उपस्थितीत पदवी प्रदान करण्यात आली.

प्रा. नलगे यांना महाराष्ट्र सरकारचे तेरा ग्रंथ पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना महाराष्ट्रातील अनेक संस्थांचेही महत्त्वाचे 67 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘मला समाजातील सर्व स्तरांतील मायावंतांच्या प्रेरणा मिळाल्या म्हणूनच माझी जीवनाची वाट प्रकाशमय बनत गेली, असे प्रा. नलगे यांनी यावेळी सांगितले.

प्रा. नलगे यांना डी. लिट. पदवी 15 फेब्रुवारी 2018 रोजी प्रदान करण्यात येणार होती. परंतु, अपरिहार्य कारणामुळे त्या दिवशी प्रा. नलगे यांना उपस्थित राहता आले नव्हते. म्हणून दि. 4 एप्रिल रोजी मुंबईत पदवी प्रदान करण्यात आली.