Thu, Mar 21, 2019 23:21
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › चंद्रकांतदादांच्या विरोधात चंदगडमध्ये घोषणाबाजी, १५ जणांना अटक

चंद्रकांतदादांच्या विरोधात चंदगडमध्ये घोषणाबाजी, १५ जणांना अटक

Published On: Mar 03 2018 10:05PM | Last Updated: Mar 03 2018 10:05PMचंदगड : प्रतिनिधी

चंदगड येथील नूतन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात चंदगड येथे घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी दहा युवकांवर गुन्‍हे दाखल करण्यात आले आहेत. चंदगड नगरपंचायत आणि दौलत वाचली पाहिजे यासाठी घोषणाबाजी करणाऱ्या युवकांवर चंदगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ॲड. संतोष मळवीकर, भारत गावडे, विष्णू गावडे, पिनू पाटील, कल्लापा निवगिरे, प्रताप डसके, नागेश चौगुले, राज सुभेदार, सत्वशील पाटील, रमाकांत गावडे यांच्यावर  हा गुन्हा दाखल झाला आहे. भादविस ३५३, १४३, १४७ अन्वये गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

चंदगड येथील नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी चंद्रकांतदादा भाषण करण्यासाठी उभा राहिले असताना चंदगड तालुक्यातील तरुणांनी तालुक्याचे गंभीर प्रश्नांची पहिल्यांदा सोडवणूक करा आणि नंतरच भाषणाला सुरुवात करा अशा घोषणा देण्यात आल्या. सभास्‍थळी गोंधळ झाल्याप्रकरणी चंदगड पोलिसांनी १५ जणांना अटक केली आहे.