Tue, Oct 24, 2017 16:58
29°C
  Breaking News  

होमपेज › Kolhapur › ...अन्‌ चंद्रकांत पाटील गहिवरले

...अन्‌ चंद्रकांत पाटील गहिवरले

Published On: Aug 13 2017 1:39PM | Last Updated: Aug 13 2017 1:39PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महत्त्वपूर्ण निर्णयांच्या फाईल्स आणि बाजूने कार्यकर्त्यांचा गराडा....एका पाठोपाठ एक सार्वजनिक कार्यक्रम, पक्ष, संघटनेच्या बैठका...या व्यस्त कार्यक्रमातही एखादा मंत्री किंवा नेता तितकाच संवेदनशील असतो. याचे उदाहरण आज कोल्हापुरात पहायला मिळाले. राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना एका सार्वजनिक कार्यक्रमात गहिवरून आले. त्यांच्यातील संवेदनशील माणूस आज वेगळ्या रुपाने कोल्हापूरकरांच्या पुढे आला.

रविवारी विविध प्रवर्गांतील विकलांग मुलांसमेवत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सांकेतिक परिभाषेत (साईन लँग्वेज) सादर केलेल्या राष्ट्रगीताच्या चित्रफितीचे कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात आज प्रकाशन झाले. त्या वेळी भाषणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अश्रू अनावर झाले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'दिव्यांग विद्यार्थ्यांच्या एका वेगळ्या विश्‍वात आलो आहे. माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत.' राज्यात कोणतेही दु:ख राहू नये, असे सांगत त्यांनी आपले अश्रू आवरते घेत कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, महापौर हसीना फरास उपस्थित होत्या. दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राष्ट्रगीतात कोल्हापूरचे आठ विद्यार्थी असल्याबाबत मंत्री पाटील यांनी अभिमान व्यक्त केला आणि दिव्यांगांसाठी लोकप्रतिनिधी, समाज घटकांनी पुढे यावे, असे आवाहनही केले. भाषण आवरते घेत पालकमंत्री पाटील कार्यक्रमातून बाहेर पडले.