होमपेज › Kolhapur › कर्नाटक पोलिसांनी मराठा लॉंग मार्च अडविल्याने तणाव 

कर्नाटक पोलिसांनी मराठा लॉंग मार्च अडविल्याने तणाव 

Published On: Aug 02 2018 1:40PM | Last Updated: Aug 02 2018 1:41PMहमीदवाडा : प्रतिनिधी

सेनापती कापशी येथून चलो कोल्हापूर(पायी) लाँग मार्च कर्नाटक पोलिसांनी अडवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सीमेवर आंदोलक कार्यकर्ते आणि कर्नाटक पोलिसांमध्ये वादावादी झाली. आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत कर्नाटक पोलिस आणि वाहने पिटाळून लावली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  सेनापती कापशी (ता.कागल) येथून मराठा आरक्षणासाठी 60 किमी अंतराचा पायी लाँग मार्च काढण्यात येत होता. मार्च लिंगनूर कापशी येथे आल्यनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांनी अडविल्याने सीमेवरच आंदोलक कार्यकर्ते व कर्नाटक पोलीस यांच्यात झोंबझोंबी व वादावादी झाली. यावेळी आंदोलकांनी कर्नाटक पोलिसांबाबत तीव्र संताप व्यक्त केला. कर्नाटक पोलिसांना व त्यांच्या वाहनांना कर्नाटक हद्दीत पिटाळून लावले.

दरम्यान उत्तर कर्नाटक या स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी कर्नाटकात आज बंद असल्याचे सांगत कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक हद्दीतुन जाण्यास विरोध केल्याने अखेर महाराष्ट्र  हद्दीपर्यंत वाहनातून जावे व तिथून पुन्हा पायी जावे असे ठरले.