Sun, Aug 18, 2019 21:35होमपेज › Kolhapur › शिवछत्रपतींचा रथोत्सव लोकोत्सव व्हावा

शिवछत्रपतींचा रथोत्सव लोकोत्सव व्हावा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

दख्खनचा राजा जोतिबा यात्रेनंतर करवीरनगरीत होणार्‍या शिवछत्रपती आणि रणरागिणी ताराराणी यांचा रथोत्सव सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा व्हावा, कोल्हापूरचे हे सांस्कृतिक वैशिष्ट्य सर्वदूर पोहोचावे यासाठी प्रत्येक कोल्हापूरकराने कर्तव्य भावनेतून प्रयत्न करण्याचे आवाहन शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक गिरीश जाधव यांनी केले.

सोमवारी (दि. 2 एप्रिल) रात्री भवानी मंडपातून छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव पार पडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी नियोजन बैठकीचे भवानी मंडपात झाली. बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित होते. 

स्वागत छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे विश्‍वस्त अ‍ॅड. आर.  एल. चव्हाण यांनी केले. प्रास्ताविकामध्ये शाहीर शहाजी माळी यांनी रथोत्सव सोहळा, रथाचा मार्ग याचे नियोजन सांगितले. तसेच उपस्थितांकडून सूचना मागविला. यावेळी कार्यकर्त्यांनी रांगोळ्यांमध्ये महापुरुषांच्या प्रतिकृती साकारू नयेत, असे आवाहन केले. तसेच मार्गावर पुरेशी विद्युत रोषणाई करण्यासाठी व्यापार्‍यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. स्थानिक नगरसेवकांसह कोल्हापूरच्या सर्वच नगरसेवकांनी व लोकप्रतिनिधींनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. बैठकीला फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, फिरोज पठाण, संभाजीराव मांगोरे, शाहीर आझाद नायकवडी, विक्रम जरग, अमर पाटील, विनायक फाळके, साताप्पा कडव, अक्षय मगदूम आदी उपस्थित होते. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, celebrate, Rathmajostav, Chatrapati Shivaji Maharaj, peoples festival


  •