होमपेज › Kolhapur › भाविकाची लाखाची रोकड लंपास

भाविकाची लाखाची रोकड लंपास

Published On: Jan 05 2018 1:12AM | Last Updated: Jan 05 2018 12:42AM

बुकमार्क करा
कोल्हापूर :

अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अरुण सुखदेव मुदगुलकर (वय 37, रा. अंबाजोगाई, बीड) या भाविकाची एक लाखाची रोकड अज्ञाताने लंपास केली. मंदिर आवारातच हा प्रकार झाल्याची फिर्याद त्यांनी राजवाडा पोलिसांत दिली. मुदगुलकर देवदर्शनासाठी एक जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी गेले. देवदर्शन करून पितळी उंबर्‍याजवळ आले असता, खिशातील पाकीट चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.