Sun, Feb 17, 2019 21:21होमपेज › Kolhapur › चंदगडमध्ये कार अपघातात विद्यार्थी ठार

चंदगडमध्ये कार अपघातात विद्यार्थी ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चंदगड(कोल्‍हापूर) प्रतिनिधी

बेळगाव-वेंगुर्ला रस्‍त्यावर झालेल्या कार अपघातात दहावीचा विद्यार्थी जागीच ठार झाला. तालुक्यातील नागणवाडीजवळ हा भीषण अपघात झाला. रोहन शिवाजी गावडे (वय १६) रा. शिरगाव असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर चालक अजय यशवंत कुंदेकर(वय १६) हा गंभीर जखमी झाला आहे. 

अजय कुंदेकर हा  वडिलांची अल्टो कार घेऊन कोरज येथे मामाच्या गावी मित्र रोहन याला सोबत घेऊन गेला होता. परत येत असताना नागणवाडी नजीक अजय याचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी गाडी रस्त्याकडेला असलेल्या आंब्याच्या झाडाला जोराने धडकली. त्यानंतर शेतात कोसळली. यावेळी गाडीतील रोहन गावडे हा जागीच ठार झाला. तर चालक अजय गंभीर जखमी झाला. 

Tags : car accident, chandgad, kolhapur, kolhapur news


  •