Fri, Sep 21, 2018 13:40होमपेज › Kolhapur › एस. टी. बससेवा आजपासून सुरळीत

एस. टी. बससेवा आजपासून सुरळीत

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

एस. टी. कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप शनिवारी (दि. 9) रात्री मिटला आहे. त्यामुळे रविवारी पहाटेपासून सर्व मार्गावरील बससेवा सुरू होणार आहेत.

एस. टी. कर्मचार्‍यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. बंदमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. दरम्यान, एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचार्‍यांना वेतनवाढ जाहीर केल्याने शनिवारी रात्री दहा वाजता एस. टी. कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला. कोल्हापूर आगारातून रविवारी पहाटे 5.45 वाजता कोल्हापूर-पुणे पहिली बस सुटणार आहे. मात्र, प्रवाशांना शनिवारची रात्र बसस्थानकावर ताटकळत काढावी लागली. सर्व बसेस नियमित वेळेनुसार सुरू होणार असल्याचे कनिष्ठ आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी सांगितले.