Mon, Nov 19, 2018 23:39होमपेज › Kolhapur › गारगोटी येथे एसटी बसखाली सापडून एक ठार 

गारगोटी येथे एसटी बसखाली सापडून एक ठार 

Published On: Dec 29 2017 12:53PM | Last Updated: Dec 29 2017 12:53PM

बुकमार्क करा
गारगोटी : प्रतिनिधी

येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर गडहिंग्लज आगाराच्या  एसटी बसच्या चाकाखाली सापडून पादचारी जागीच ठार झाला. पांडुरंग जाधव (रा. पाल  ता. भुदरगड) असे ठार झालेल्‍या पादचाऱ्याचे नाव आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती.

बस (क्र. एम.एच.20 डी 8535) गारगोटीहून गडहिंग्लजकडे जात असताना गारगोटी-गडहिंग्लज रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ हा अपघात झाला.