Sun, Feb 17, 2019 04:01होमपेज › Kolhapur › मनपाचे आज स्थायीला बजेट सादर

मनपाचे आज स्थायीला बजेट सादर

Published On: Mar 07 2018 1:52AM | Last Updated: Mar 06 2018 11:55PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेच्या 2018-19 चा अंदाजपत्रकीय आराखडा (बजेट) आयुक्त अभिजित चौधरी बुधवारी स्थायी समितीला सादर करणार आहेत. याच वेळी परिवहन (केएमटी) आणि शिक्षण मंडळाचेही अंदाजपत्रकीय आराखडे आयुक्त चौधरी हे स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांना सादर करतील. 

2017-18 चे बजेट 397 कोटींचे होते; परंतु वर्ष संपत आले, तरी महापालिका प्रशासनाला पावणेतीनशेचाही टप्पा पार करता आलेला नाही. परिणामी, चालू बजेटमध्ये तब्बल शंभर ते सव्वाशे कोटींची तूट राहणार आहे. त्याचा फटका शहरातील विकासकामांसह कर्मचार्‍यांच्या पगारालाही बसणार आहे. परिणामी, 2018-19 चे  बजेटही सुमारे चारशे कोटींच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या वतीने उत्पन्नवाढीसाठी नवे पर्याय सादर केले जातील का, याची उत्सुकता बजेटमध्ये असेल.