Fri, Sep 21, 2018 10:20होमपेज › Kolhapur › कोल्हापूर महापालिकेत भाजपचा राष्ट्रवादीला धक्का

कोल्हापूर महापालिकेत भाजपचा राष्ट्रवादीला धक्का

Published On: Feb 12 2018 12:30PM | Last Updated: Feb 12 2018 12:31PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवणुकीत सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मते फुटल्यामुळे पक्षाच्या उमेदवार मेघा पाटील यांचा पराभव झाला असून, स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे आशिष ढवळे यांची वर्णी लागली आहे.

आज झालेल्या स्थायी समिती सभापदी निवडणुकीत भाजपच्या ढवळे यांना ९ तर राष्ट्रवादीच्या मेघा पाटील यांना सात मते पडली. स्थायी समितीमधील राष्ट्रवादीचे दोन सदस्य फुटल्यामुळे पक्षाला लाजीरवाण्या पराभवाला सामोर जावे लागले आहे. यात प्राथमिक महितीनुसार अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे हे दोन नगरसेवक फुटल्याची समजते. 

कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला स्थायी समितीच्या सभापतीपदाची संधी होती. मेघा पाटील निवडून आल्या असत्या, तर पहिल्यांदा समितीचे अध्यक्षपद एका महिलेकडे गेले असते. मात्र, आज, महापालिकेत झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे मेघा पाटील इतिहास रचण्यात अपयशी ठरल्या.