Mon, Jun 17, 2019 02:56होमपेज › Kolhapur › गवारेड्याने आजरा-पेरणोली रस्ता रोखला

रस्ता बंद; कारण पुढे गवा आहे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आजरा : वार्ताहर 

आजरा तालुक्यातील साळगाव, सोहाळे व पेरणोली परिसरात गवारेड्यांची दहशत असून रात्री आजरा-पेरणोली मार्गावरील साळगाव जंगलक्षेत्र हद्दीतील रस्ता गवारेड्याने अडवला. अचानक गवारेडा रस्त्यावर येऊन उभा राहिल्याने या मार्गावरून ये-जा करणार्‍या वाहनचालकांची भंबेरी उडाली. साधारणतः अर्धा तास हा गवारेडा रस्त्यावरच थांबून होता. गवारेडा रस्त्यावरून जंगलामध्ये गेल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.

विनायकवाडी येथील विशाल कराडे यासह पेरणोली येथील काहीजण देवकांडगाव-पेरणोलीच्या दिशेने जाताना रात्री 7.30 वाजता साळगाव येथे गवारेडा अचानक रस्त्यावर उतरला. त्यामुळे तालुकावासीय भीतीच्या छायेखालीच वावरत असताना पहावयास मिळत आहेत.