Tue, Nov 19, 2019 13:03होमपेज › Kolhapur › गव्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजूर जखमी

गव्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजूर जखमी

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 1:32AM

बुकमार्क करा

बाजारभोगाव : वार्ताहर

गव्याने धडक दिल्याने  बाजारभोगावपैकी मोतईवाडी (ता. पन्हाळा) येथील ऊसतोडणी मजूर शंकर चंद्राप्पा सापते (वय 62) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास काऊरवाडीकडे अन्य मजुरांसोबत ते ऊस तोडणीसाठी निघाले होते. काऊरवाडी भराडी मंदिराशेजारी असणार्‍या नाळवा शेताजवळील पायवाटेने जाताना समोर आलेला गवा त्यांना धुक्यामुळे दिसला नाही. गव्याने धडक दिल्याने ते बांधावरून खाली कोसळले. त्यांच्या बरगड्यांना व पाठीला गंभीर दुखापत झाली असून ते बेशुद्ध झाले. शामराव जाधव, बंडू राबाडे, पोपट राबाडे तसेच वनमजूर सखाराम खोत यांनी सापते यांना खासगी वाहनातून सीपीआरमध्ये दाखल केले. वनपाल सदाशिव जाधव व वनरक्षक स्वप्नाली जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.