Sat, May 30, 2020 11:14होमपेज › Kolhapur › भोगावती कारखान्‍याच्या जखमी अधिकार्‍याचे निधन

भोगावती कारखान्‍याच्या जखमी अधिकार्‍याचे निधन

Published On: Dec 29 2017 6:30PM | Last Updated: Dec 29 2017 6:30PM

बुकमार्क करा
कौलव: प्रतिनिधी

हळदी (ता. करवीर) येथील अपघातात जखमी झालेले भोगावती साखर कारखान्याचे अधिकारी सूर्यकांत कृष्णाजी पाटील (वय ५८, रा. कुरुकली ता. करवीर) यांचे आज खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

पाटील हे बुधवारी संध्याकाळी फिरायला गेले होते. यावेळी हळदीनजीक शेतकरी धाब्याजवळ त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यामध्ये गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कोल्हापूरात खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांचे निधन झाले. पाटील कुरूकली येथील विविध सामाजिक कामात अग्रेसर होते. कारखान्याचा एक उमदा व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याने भोगावती परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आज कुरूकली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.