Mon, Feb 18, 2019 19:46होमपेज › Kolhapur › आजी-माजी संचालकांच्या चौकशीकडे लागल्या नजरा

आजी-माजी संचालकांच्या चौकशीकडे लागल्या नजरा

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 12:41AM

बुकमार्क करा

गुडाळ : वार्ताहर

भोगावती सहकारी साखर कारखान्यातील सन 2010 ते 2013 या तीन वर्षांच्या काळातील कथित गैरकारभाराची प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या आदेशाने सुरू असलेली कलम 83 नुसार चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. ज्या 15 मुद्द्यांवरून ही चौकशी सुरू आहे. त्यापैकी तब्बल 8 मुद्दे 2005 ते 2010 या काळात सत्तेवर असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या संचालक मंडळालाही लागू होत असल्याने चौकशीअंती कारवाई झालीच तर ‘भोगावती’च्या विद्यमान उपाध्यक्षांसह विद्यमान 8 संचालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ‘भोगावती’च्या या चौकशीला न्यायालयाने दिलेली स्थगिती उठल्यानंतर चौकशी अधिकारी डी. ए. चौगले यांनी चौकशी यंत्रणा गतिमान केली असून, चौगले यांच्या चौकशी अहवालाकडे आणि त्यानंतरच्या प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या निर्णयाकडे संबंधित आजी-माजी 43 संचालकांसह कार्यक्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.  संभाव्य कारवाईशी संबंधित राष्ट्रीय काँग्रेसच्या 16 आजी-माजी संचालकांचा समावेश आहे, तर राष्ट्रवादी, शे. का. पक्ष आणि जनता दलाचे 27 माजी संचालक या कारवाईशी संबंधित आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे 19, शे. का. पक्षाचे 7, तर जनता दलाच्या एका माजी संचालकाचा समावेश आहे.