Fri, May 24, 2019 06:37होमपेज › Kolhapur › भिडे, एकबोटे, दवे यांना अटक करा

भिडे, एकबोटे, दवे यांना अटक करा

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 05 2018 11:54PMकागल : प्रतिनिधी

भिमा कोरेगाव रणसंग्रामातील शहीदांना सलामी देण्याच्या निमित्ताने जमलेल्या मुलनिवासी बहुजन समाजातील लोकांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेर्धाथ बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने कागल तहसिलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
 
यावेळी मिलींद एकबोटे व मनोहर उर्फ संभाजी भिंडे व आनंद दवे यांना अटक करावी, शांततापुर्वक संविधानिक पध्दतीने निषेधार्थ बंद पाळणार्‍या लोकांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत.
 
कोंम्बीग ऑपरेशनद्वारे अटक करण्यात आलेल्या निरापराध कार्यकर्त्यांना मुक्‍त करण्यात यावे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. 

यावेळी सिध्दार्थ नागरत्न, काशीनाथ कांबळे, सागर शिंदे, अक्षय कांबळे, राजरत्न कांबळे, सुयश कांबळे, हेमंत कांबळे, मयुर कांबळे, सुशिल काटे, नयनतारा रुपेश वाघमारे, सारीका नयन कांबळे, सुजाता देवानंद कांबळे यांच्यासह इतर मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.