Sun, Apr 21, 2019 14:21होमपेज › Kolhapur › कौतुक डाफळेकडून दत्ता नरळे चितपट

कौतुक डाफळेकडून दत्ता नरळे चितपट

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 28 2017 11:38PM

बुकमार्क करा
बानगे : वार्ताहर

बानगे (ता. कागल) येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै. कॉ. वसंतराव सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य खुल्या मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील पै. कौतुक डाफळे हा सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी येथील पै. दत्ता नरळे याला पराभूत करून एच.एफ. डिलक्स या मोटारसायकलचा मानकरी ठरला. दोन दिवसीय झालेल्या भव्य कुस्ती स्पर्धेत 383 स्पर्धकांनी सहभाग घेऊन कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

स्पर्धेत विजयी झालेल्या मल्लांना हुतात्मा किसन अहिर साखर कारखाना वाळवेचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजयबाबा घाटगे, नगराध्यक्ष राजेखान जमादार, प्रतापसिंह देशमुख, कॉ. गणपतराव पाटील, विजयसिंह मोरे, अमृता भोसले उपस्थित होते. चंद्रशेखर सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

या स्पर्धेत 25 किलो ते 90 किलो अशा 11 वजन गटातून विजयी झालेले उमेदवार असे : 25 किलो वजन गट - गणेश तेरसे (पाचगाव) - प्रथम, प्रथमेश माळी (पट्टणकोडोली) - द्वितीय, प्रतीक पाटील (पाचगाव), - तृतीय.

30 किलो - वैभव जाधव (बानगे) प्रथम, आदित्य ताटे (पाचगाव) - द्वितीय, सोमनाथ साळोखे (भामटे) - तृतीय, 35 किलो - रोहित पाटील (बानगे) - प्रथम, स्वरूप जाधव (दर्‍याचे वडगाव) - द्वितीय, ऋषिकेश नाईक (आमशी) - तृतीय, 42 किलो - पंकज पाटील (बानगे) - प्रथम, ओंकार ताटे (बानगे) - द्वितीय, विश्‍वजीत मोरे (सरवडे) - तृतीय. 46 किलो - ओंकार पाटील (कळंबा) - प्रथम, करणसिंह देसाई (राशिवडे) - द्वितीय, विशाल देवडकर (बानगे) - तृतीय.

50 किलो - अनिल पाटील (दिंडनेर्ली) - प्रथम, सुदर्शन पाटील (हदनाळ) - द्वितीय, शिवराज कणसे (मोतीबाग) - तृतीय.  57 किलो - सुहास शिंदे (इचलकरंजी) - प्रथम, नीलेश हिरुगडे (बानगे) - द्वितीय, ओंकार लाड (राशिवडे) - तृतीय. 61 किलो - अभिजित पाटील (बानगे)  - प्रथम, विशाल पोवार (राशिवडे) - द्वितीय, विक्रम मोरे (कोगे) - तृतीय. 65 किलो - सौरभ पाटील (राशिवडे) - प्रथम, सद्दाम शेख (दर्‍याचे वडगाव) - द्वितीय, राकेश भोकरे (पट्टणकोडोली) - तृतीय. 74 किलो - अक्षय हिरुगडे (बानगे) - प्रथम, किरण पाटील (इस्पुर्ली) - द्वितीय,  सागर पाटील (खुपीरे) - तृतीय.
ओपन गट - कौतुक डाफळे (पिंपळगाव बुद्रुक) - प्रथम, दत्ता नरळे (सोलापूर) - द्वितीय, विक्रम शेटे  (इचलकरंजी) - तृतीय. पंच म्हणून बट्टू जाधव, बाबासो मेटकर, संभाजी वरूटे, संभाजी पाटील, दादा लवटे, प्रकाश खोत, सिकंदर कांबळे, बबन चौगले, दादू चौगले, कृष्णात पाटील, सुरेश लंबे, के. पी. चौगले यांनी काम पाहिले. यावेळी राजाराम चौगुले व अरविंद किल्‍लेदार यांच्या खुमासदार व माहितीपूर्ण सूत्रसंचालनाने मैदानास रंगत आली.