Wed, Mar 20, 2019 02:34होमपेज › Kolhapur › बाचणी येथे उजव्या कालव्याला गळती 

बाचणी येथे उजव्या कालव्याला गळती 

Published On: Feb 11 2018 1:55AM | Last Updated: Feb 11 2018 1:11AMकेंबळी : वार्ताहर

काळम्मावाडी दूधगंगा उजव्या कालव्याला शनिवारी (दि. 10) पाणी सोडताच केंबळी-बाचणी (ता. कागल) दरम्यान कालवा अस्तरीकरणासाठी व्हायब्रेट मशीनद्वारे कालवा खुदाई झाल्याने भरावा हालून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती झाली. पाण्याच्या जोरदार मार्‍यामुळे बाचणी येथील दत्तात्रय बाळू खामकर तसेच ज्ञानदेव दादू पाटील यांची दहा गुंठे जमीन तुटून विहीर इंजिनसह बुजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गळती परिसरात रणजित अजित पाटील, एम. आर.पाटील, इलिस देसा, मधुकर दगडू खामकर, बाळासो दगडू खामकर यांच्या उसाच्या लागणीसह शेतवडीत पाणीच पाणी होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधित शेतपिकाच्या नुकसानीसह विहीरींचा पंचनामा होऊन नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी संबंधित शेतकर्‍यांतून होत आहे.