होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : तरुणावर खुनी हल्‍ला

कोल्हापूर : तरुणावर खुनी हल्‍ला

Published On: Jun 20 2018 1:33AM | Last Updated: Jun 20 2018 1:27AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पूर्ववैमनस्यातून कळंबा येथील कात्यायनी पार्कात सायंकाळी सौरभ भिकाजी आळवेकर (वय 19) याच्यावर विळ्याने वार करण्यात आला. वार मानेवर लागल्याने तो गंभीर जखमी झाला. सीपीआर रुग्णालयात त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. 

सौरभचे सुशांत शिंदेसोबत भांडण झाले होते. सौरभ घराजवळ थांबला असताना एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून दोघांत वादावादी झाली. विळा घेऊन सुशांत त्याच्या अंगावर धावून गेला. वार मुख्य रक्‍तवाहिनीपर्यंत गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्‍तस्राव होऊ लागला. गर्दीचा फायदा घेत हल्‍लेखोर सुशांत पसार झाला.