होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : जातीवाचक शिवीगाळप्रकरणी शिक्षकाविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्‍हा

कोल्‍हापूर : जातीवाचक शिवीगाळप्रकरणी शिक्षकाविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्‍हा

Published On: Jun 24 2018 1:55AM | Last Updated: Jun 24 2018 1:55AMकुरुंदवाड : प्रतिनिधी

मुख्याध्यापका सोबत रजेविषयी चर्चा करत असताना शिक्षकाने गैरसमज करून घेऊन शिपायास जातीवाचक शिवीगाळ करून अपशब्दांचा उच्चार केले प्रकरणी शिक्षक आनंदा सदाशिव काशीकर (रा. शिरदवाड ता.शिरोळ) याचेविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा व सुधारित कायदा 2015 कायदा,कलमा नुसार अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद शिपाई पांडुरंग गोविंद पोवार (रा.लाटवाडी ता.शिरोळ.मूळ रा.पुनाळ ता. पन्हाळा यांनी कुरूंदवाड पोलिसात दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की शिवनाकवाडी येथील न्यू इंग्लिश हायस्कूल येथे आनंद काशीकर हे शिक्षक म्हणून तर पांडुरंग पोवार हे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान आज सकाळी साडे अकरा वाजता सुमारास शिपाई पोवार हे रजेसाठी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करत असताना.शिक्षक काशीकर यांच्या विषयीच काहीतरी चर्चा करत असल्याचा गैरसमज करून घेऊन शिपाई पोवार हे मागासवर्गीय समाजाचे असल्याने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून अपशब्दांचा उच्चार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 या गुन्ह्याचा तपास जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे करीत आहेत.