होमपेज › Kolhapur › अटल चषक फुटबॉल : शिवाजी तरूण मंडळाची विजयी सलामी

अटल चषक फुटबॉल : शिवाजी तरूण मंडळाची विजयी सलामी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूर येथील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आजच्या दुसऱ्या सामन्यात शिवाजी तरूण मंडळाने दमदार खेळ करत रुणमुक्तेश्वर वर ४-० ने सहज विजय मिळवला. धडाकेबाज सुरुवात करत पहिल्या हाफ पर्यंत शिवाजी २ गोल केले होते. अक्षय सरनाईक याने सामन्याला सुरुवात झाल्या झाल्या दोन गोल करत आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर पहिल्या हाफ नंतर अक्षयने  तिसरा गोल करतअटल चषक स्पर्धेतील पहिली हॅट ट्रिक साजरी केली. 

या सामन्यात पहिल्या मिनिटापासूनच बलाढ्य शिवाजी तरुण मंडळाने वर्चस्व राखले आहे. रुणमुक्तेश्वरने काही आक्रमक चढाया करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना शिवाजीचा बाचाव भेदण्यात अपयश  आले. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार अक्षय सरनाईक याला देण्यात आला.

आजच्या पहिल्या रोमहार्षक सामन्यात प्रॅक्टिसने संध्यामठवर सडन डेथने विजय मिळवला. 

अटल चषक फुटबॉल : प्रॅक्टिसचा संध्यामठवर सडन डेथमध्ये विजय

लाईव्ह अपडेट : 

*शिवाजी तरुण मंडळाकडून रुणमुक्तेश्वरचा  ४-० असा धुव्वा 

*शिवाजीला कॉर्नर किक , गोल करण्याची संधी दवडली 

*शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू जखमी, फिजिओ मैदानात 

*शिवाजीचे आक्रमण, पण बॉलवर नियंत्रण ठेवता न आल्याने गोल करण्याची संधी वाया 

*शिवाजी तरुण मंडळाचा आक्रमक खेळ सुरुच, शिवाजी ३ -० ने आघाडीवर 

*हाफनंतर शिवाजीची दमदार सुरुवात, अक्षय सरनाईकची हॅट ट्रिक 

*पहिल्या हाफ पर्यंत शिवाजी २ गोल तर रुणमुक्तेश्वर ० गोल 

*रुणमुक्तेश्वरची जोरदार चढाई,पण शिवाजीचा उत्तम बचाव 

*शिवाजी तरुण मंडळाचा दुसरा गोल, शिवाजीची दमदार सुरुवात 

*शिवाजी तरुण मंडळाची आक्रमक सुरुवात, अक्षय सरनाईकचा पहिला गोल

*शिवाजी तरुण मंडळ आणि रुणमुक्तेश्वर सामन्यास सुरुवात 

 

दुसरा हाफ (video)

 

पहिला हाफ (video)


  •