Thu, Apr 25, 2019 04:06होमपेज › Kolhapur › अटल चषक : प्रॅक्टिसचा बालगोपावर १-० ने विजय

अटल चषक : प्रॅक्टिसचा बालगोपावर १-० ने विजय

Published On: Apr 11 2018 5:05PM | Last Updated: Apr 11 2018 7:00PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी सामन्यात बालगोपाल तालमीचा १-० ने पराभव केला. प्रॅक्टिसडून  राहुल पाटीलने सामन्यातील एकमेव गोल नोंदवला. बालगोपालला सामन्यात गोल करण्याची संघी मिळाली होती पण, त्यांच्या रोहित कुरणेने ही संघी दवडली.  

अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील लीग सामन्यात आज बालगोपालचा सामना प्रॅक्टिस यांच्यात सामना झाला. अटल चषक स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे तसतशी प्रत्येक सामन्यागणीक उत्कंठा वाढत आहे. पुढारी टोमॅटो अटल चषक फुटबॉल स्पर्धेचे माध्यम प्रयोजक आहे.

लाईव्ह अपडेट : 

*प्रॅक्टिसचा बालगोपावर १-० ने विजय

*शेवटची पाच मिनिट शिल्लक, प्रॅक्टिसकडे १ गोलची आघाडी 

*बालगोपालचा गोल फेडण्याचा जोरदार प्रयत्न 

*बालगोपालच्या रोहित कुरणेने गोल करण्याची संघी दवडली

*प्रॅक्टिसचा खेळाडू जखमी, स्ट्रेचरवरुन बाहेर नेण्यात आले

*प्रॅक्टिसची आक्रमक चढाई पण, गोल करण्यात अपयश

*प्रॅक्टिसच्या आक्रमक चढाया

प्रॅक्टिसच्या राहुल पाटीलने पहिला गोल नोंदवला., प्रॅक्टिस १-० ने आघाडीवर 

*सेकंड हाफ सुरु

*हाफ टाईम पर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश 

*दोन्ही संघांचा गोल करण्याचा प्रयत्न 

*सामन्यास सुरुवात