Wed, Nov 21, 2018 05:50होमपेज › Kolhapur › अटल फुटबॉल चषक : PTMचा उत्तरेश्वरवर ४-० ने विजय (Video)

अटल फुटबॉल चषक : PTMचा उत्तरेश्वरवर ४-० ने विजय (Video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर सुरु असलेल्या अटल फुटबॉल चषक २०१८ मधील अ गटातील सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ (PTM) ने उत्तरेश्वर वाघााची तालीम संघाचा ४-० ने पराभव केला.  पुढारी वृत्तसमूहाचे टोमॅटो एफएम या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे. 

पाटाकडील तालीम (अ) विरुद्ध उत्तरेश्वर वाघाची तालीम संघात झालेल्या सामन्यात पाटाकडील संघाने ४-०ने विजय मिळवला. सामन्याच्या ३९व्या मिनिटाला ऋषीकेश मेथे पाटीलने गोल करत संघाला खाते उघडून दिले. मध्यंतरापर्यंत पाटाकडील तालीम मंडळाने १-० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर संघाने आक्रमक चढाई करत तीन गोल केले. यात ओमकार जाधवने ५५ व्या मिनिटाला गोल केला. तर ऋषीकेश मेथे पाटीलने ७० व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल करत संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. तर ७७व्या मिनिटाला राजेंद्र काशिद याने उत्तरेश्वरवर चौथा गोल केला. या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने एकतर्फी वर्चस्व राखत सहज विजय मिळवला.यात सामनावीरचा मानकरी ओमकार संभाजी जाधव(PTM) हा ठरला तर प्रकाश संकपाळने (उत्तरेश्वर) लढवय्याचा मान पटकावला.

पीटीएमचा (अ) अटल चषकातील हा पहिलाच सामना असल्याने त्यांच्या चाहत्यांनी या विजयानंतर जोरदार जल्लोष केला.

लाईव्ह अपडेट : 

PTMचा उत्तरेश्वरवर ४-० ने विजय

PTMचा चौथा गोल; सामन्यात ४-० ची आघाडी

PTMची सामन्यावर मजबूत पकड; उतरेश्वरवर तिसरा गोल

PTM चा उत्तरेश्वरवर आणखी एक गोल, सामन्यात २-० ने आघाडी

PTM चा पहिला गोल, सामन्यात १-० ने आघाडी 

*दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश

*PTM विरुध्द वाघाची तालीम सामना सुरु 


  •