Wed, Jul 17, 2019 00:28होमपेज › Kolhapur › अटल चषक फुटबॉल : प्रॅक्टिसचा संध्यामठवर सडन डेथमध्ये विजय

अटल चषक फुटबॉल : प्रॅक्टिसचा संध्यामठवर सडन डेथमध्ये विजय

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी


कोल्हापूर येथील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आज, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (ब) संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना सडन डेथवर प्रॅक्टिसने विजय मिळवला. पूर्वार्धापर्यंत हा सामना बरोबरीत राहिला, दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करण्यात अपयश आले. पुढारी वृत्तसमूहाचे टोमॅटो एफएम या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे. 

सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी वेगवान खेळ करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही संघांच्या आघाडीपटूंना गोल करण्याच्या चांगल्या संधी मिळाल्या होत्या. पण, फिनिशिंग अभावी गोल करण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे पूर्वर्धात दोन्ही संघांची पाटी कोरीच राहिली. संध्यामठला गोल करण्याच्या दोन चांगल्या संधी मिळाल्या होत्या. सतीश अहिरे याचा एक फटका गोल पोस्टला लागून पुन्हा मैदानात आला. उत्तरार्धात दोन्ही संघानी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टवर चढाया केल्या. प्रॅक्टिसच्याअक्षय मानेला संधी मिळताच  त्याने गोल केला, प्रक्टिस १-०ने आघाडी घेतली,  पण ही आघाडी जास्तकाळ टिकली नाही. संध्यामठच्या प्रकाश पाटीलने गोल करत सामना १-१ बरोबरीत आणला. संपूर्ण वेळेत हा सामना १-१ बरोबरीत राहिला.

त्यानंतर टाय ब्रेकर देखील ४-४ बरोबरीत सुटला. त्यामुळे सामन्याची उत्कंठा शिगेला पोहचली. शेवटी प्रॅक्टिस (ब)ने सडन डेथवर  सामना जिंकला. सामनावीर म्हणून प्रॅक्टिसच्या अक्षय मानेला गौरवण्यात आले. तर संध्यामठच्या आशिष मानेला लढवय्या खेळाडीचा पुरस्कार देण्यात आला. 
 

 

अटल चषक फुटबॉल : शिवाजी तरूण मंडळाची विजयी सलामी

दरम्यान, काल (गुरुवार, २९ मार्च) झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब (अ) संघाने पाटाकडील तालीम मंडळ (ब) संघावर ३-० असा विजय मिळवला  

लाईव्ह अपडेट

*संध्यामठच्या खेळाडूने मारलेला फटका प्रॅक्टिसच्या गोलकिपरने अडविल्याने प्रॅक्टिसचा विजय 

*दुसऱ्या प्रयत्ना प्रॅक्टिसचा गोल

* सडन डेथमध्येही पहिल्या प्रयत्नात एक-एक बरोबरी

*टायब्रेकर ४-४ बरोबरीत, सडनडेथ १-१ बरोबरीत, सामन्याची उत्कंठा शिगेला  

*संध्यामठ - प्रॅक्टिस १-१ बरोबरीत, सामन्याचा निकाल टाय ब्रेकरवर होणार  

*सामन्याचा वेग वाढला, दोन्ही संघाकडून आक्रम चढाया सुरु 

*प्रकाश पाटीलचा गोल, संध्यामठकडून गोलची लगेच परतफेड

*अक्षय मानेचा गोल, प्रक्टिस १-०ने पुढे 

*दुसऱ्या हाफपर्यंत सामना बरोबरीत 


  •