Fri, May 24, 2019 08:52होमपेज › Kolhapur › सहा. प्राध्यापक पदभरती बंदी विरोधात कोल्हापुरात आंदोलन(व्हिडिओ)

सहा. प्राध्यापक पदभरती बंदी विरोधात कोल्हापुरात आंदोलन(व्हिडिओ)

Published On: May 04 2018 1:25PM | Last Updated: May 04 2018 1:18PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

सहाय्यक प्राध्यापक पदभरती बंदी विरोधात सेट, नेट आणि पीएचडी पात्रताधारकांनी विभागीय माहिती कार्यालय आणि उच्च शिक्षण कार्यालय राजाराम कॉलेज येथे निषेध मोर्चा काढला. मान्य करा, मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणा देत सेट, नेट आणि पीएचडी पात्रताधारकांनी केंद्र आणि राज्‍य सरकारचा निषेध केला. 

मागण्यांचे निवेदन देण्यासाठी कार्यालयात विभागीय सहसंचालक उपस्‍थित नसल्‍याने आंदोनकांनी आवक जावक विभागात आपल्‍या मागण्यांचे निवेदन दिले. विभागीय संचालक यांनी आज मुद्दाम रजा घेतल्‍याचा आरोप करत आंदोलकांनी त्‍यांचाही निषेध केला. 

सहाय्यक प्राध्यापक पदभरतीवरील बंदी तात्‍काळ उठवावी, तासिका तत्‍वावर सहाय्यक प्राध्यापक म्‍हणून केलेल्‍या कामाचा अनुभव कायम नियुक्‍तीनंतर ग्राह्य धरावा, सर्व अनुदानित महाविद्यालयातील रिक्‍त जागा पूर्ण काळासाठी भरण्यात याव्यात, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेवून विनाअनुदानित तुकड्यांना त्‍वरित अनुदान द्यावे, ६ जुलै २०१७ नंतर प्राध्यापक पदभरती बंदी विरोधातील निवेदने आणि आंदोलनांबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करावी, सहा. प्राध्यापकांच्या ५० टक्‍के भरतीऐवजी शंभर टक्‍के भरतीला शासनाने मान्यता द्यावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्‍या आहेत. 

या मागण्यांचा विचार नाही केला तर, १५ मे रोजी मुंबई येथे तिव्र आंदोलन करू, असा इशारा या अंदोलकांनी यावेळी दिला. 

Tags : rajaram mahavidyalaya kolhapur, assistant profesör recruitment,  government