Wed, Sep 26, 2018 16:10होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : प्रति पंढरपूर नंदवाळ येथे आषाढी यात्रा  

कोल्‍हापूर : प्रति पंढरपूर नंदवाळ येथे आषाढी यात्रा  

Published On: Jul 23 2018 9:26AM | Last Updated: Jul 23 2018 9:25AMदेवाळे(जि. कोल्‍हापूर) : वार्ताहर

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिपढरपूर  नंदवाळ ताकरवीर येथे आज (दि. २३ जुलै) आषाढी यात्रा व पूईखडी येथे गोल रिगंण सोहळा होत असून यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. या यात्रेत मंदिर आवारात नारळ फोडणे व डीजीटल फलक लावण्यास बंदी  आहे.

आधी नंदापूर मग पंढरपूर  अशी आख्यायिका आसणार्‍या नंदवाळ येथे आषाढी एकादशीच्या पहाटे चार पर्यंत पंढरीचा पाडूरंग    या मंदिरात वास्तव्य करतो असा करवीर महात्म्य ग्रंथात उल्लेख आहे. हे मंदिर प्राचिन आसून, या मंदिरातील  मूर्ती स्वयंभू असून, पाडूरंगासह  रूक्‍मीनी आणि सत्यभामा राई यांच्या तीन मुर्ती एकत्र असल्याने वैशिष्‍ठपूर्ण मंदिर असून, नंदवाळ हे विठ्ठलाचे निजस्थान आहे.

आषाढी वारिला मोठा वैष्णांचा सोहळा होत आहे. या सोहळ्याला लाखो भाविक  दर्शनासाठी येतात. कोल्हापूर ते नंदवाळ असा पालखी सोहळा होत असून, या सोहळ्यात  विविध गावच्या दिंड्या सहभागी होतात  आणि  पूईखडी येथे रिंगण सोहळा पार पडतो.  हा सोहळा पाहण्यासाठी विठ्ठल भक्त मोठ्या संखेने हजर राहात असतात. तसेच भोगावती राधानगरी भागातून ये णार्‍या दिडींचे रिंगण खत कारखाना वाशी  येते होते . रिगण झाल्‍यांनतर भाविक  शिस्तबध्द पणे  दिंडीसह नदवाळ मदिराकडे येतात.