Tue, Jul 23, 2019 02:12होमपेज › Kolhapur › डॅडींची मुलगी होणार कोल्हापूरची सून (video)

डॅडींची मुलगी होणार कोल्हापूरची सून (video)

Published On: Jul 05 2018 8:19PM | Last Updated: Jul 05 2018 9:17PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

छत्रपती प्रमिलाराले रूग्णालयातील (सीपीआर)प्रसूती विभागात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले वेडिंग मशिन तसेच सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी डिस्पोजेबल मशिन्सचे उद्घाटन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या योगिता अरूण गवळी यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. हे मशीन हेल्पिंग हँड फौडेशन तासगाव, आर. के ग्रुप (कोल्हापूर शाखा) आणि 'करा' फौंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने हे मशिन्स रूग्णालयात बसवण्यात आले आहे.

उद्धाघटन सोहळ्यासाठी समाजसेविका गीता हासुरकर, नगरसेविका सीमा कदम, सीपीआर अधिष्ठाता सुधीर नणंदकर, डॉ. शिरीष शानबाग, स्मिता घोलप, रोहित शिंदे, प्रताप जाधव, रोहित कोलवलकर, संग्राम पाटील-कौलवकर उपस्थित होते. 'करा' फौंडेशनच्या माध्यमातून चार हजार इको - फ्रेंडली सॅनटरी नॅपकीन प्राथमिक स्वरूपात देण्यात आले आहेत.  या उपक्रमासाठी योगिता गवळी यांचे विशेष सहकार्य लाभले. करा फौंडेशनअंतर्गत मुंबईत सॅनॅटरी नॅपकीन बनवण्याचा लघुद‍्योग योगिता गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात आहे. 

अरूण गवळींची मुलगी होणार कोल्हापूरची सून.....
 योगिता या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांची मुलगी आहे. त्‍या लवकरच कोल्हापूरची सूनबाई होणार आहेत. ताराबाई पार्क येथील रोहित विक्रम शिंदे यांच्याशी त्‍या विवाहबध्द होणार आहेत. रोहित हे हॉटेल व्यावसायिक असून, योगिता आणि रोहित यांची ओळख मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना झाली. ‘‘तीन वर्षाच्या ओळखीनंतर एकमेकांचा सहवास आणि विचार जुळला आणि त्याचे प्रेमात रूपांतर झाल्याचे’’ त्यांनी पुढारी ऑनलाईनशी बोलताना सांगितले. मागील मह्न्यिात त्यांचा साखरपुडा झाला असून यंदा ते विवाह करणार आहेत.