Wed, Jun 26, 2019 11:26होमपेज › Kolhapur › चंदगड : जवानाची आत्महत्या

चंदगड : जवानाची आत्महत्या

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 1:00AMकोवाड : वार्ताहर

दुंडगे (ता. चंदगड) येथील लखन गंगाधर पाटील (वय 28) या जवानाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.लखन हे भारतीय सैन्य दलात बॉम्बे इंजिनिअर ग्रुपमध्ये 9 वर्षांपूर्वी भरती झाले होते. 20 दिवसांपूर्वी तेे सुट्टीसाठी गावी आले होते. 

घरातील भांडण-तंट्यामुळे लखन मानसिक तणावाखाली होते. लोखंडी सळीला दोरखंड लावून त्यांनी गळफास घेतला.ही घटना शुक्रवारी रात्री 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास घडली. लखन यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे.

मुलीच्या वाढदिनीचबापाचा अंत्यविधी

जवान लखन यांची मुलगी दुर्वा हिचा शनिवारी पहिला वाढदिवस होता. धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी लखन यांनी दोन बकरी खरेदी केली होती. पै-पाहुणे व गावातील सार्‍यांना निमंत्रण दिले होते. तेच पाहुणे आज अंत्यविधीला उपस्थित राहिल्याची चर्चा सुरू होती.