Tue, Nov 20, 2018 01:13होमपेज › Kolhapur › चंदगडचा जवान अनंत धुरी अनंतात विलीन 

चंदगडचा जवान अनंत धुरी अनंतात विलीन 

Published On: Jan 20 2018 7:37PM | Last Updated: Jan 20 2018 7:37PMचंदगड : प्रतिनिधी

चंदगड तालुक्यातील बेळेभाट येथील शहीद जवान अनंत जानबा धुरी यांच्यावर आज बेळेभाट येथे हजारोंच्या उपस्थितीत  अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीनगरपासून ५० कि. मी. अंतरावर  गुलमर्ग येथे सेवा बजावत असताना अनंत धुरी यांना हिमवृष्टीत अडकून वीरमरण आले. जवान धुरी यांची ८ वर्षाची मुलगी ऋतुजा हिने पित्याच्या चितेला भडागनी दिली.

धुरी हे ८ मराठा लाईट इंफन्ट्री बटालियनमध्ये १९९८ साली भरती झाले होते. धुरी यांच्या निधनाने चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.