Mon, Jun 24, 2019 17:57होमपेज › Kolhapur › सहकार्‍याच्या गोळीबारात आजर्‍याचा जवान ठार

सहकार्‍याच्या गोळीबारात आजर्‍याचा जवान ठार

Published On: Mar 13 2018 11:44AM | Last Updated: Mar 13 2018 11:44AMआजरा : प्रतिनिधी

सैन्य दलात असणार्‍या मित्रांमध्ये होळीदिवशी वाद झाल्यावरून सहकारी मित्राने गोळीबार केल्याने कोळींद्रे (ता. आजरा) येथील विलास मारूती संकपाळ (वय ४५) यांचा उपचार दरम्‍यान मृत्‍यू झाला. 
झारखंडमध्ये असणार्‍या सैनिकांच्या युनिटमध्ये हे वाद झाले होते. या वादानंतर सहकारी असलेल्या जवानाने युनिटमधीलच मित्रावर गोळीबार केला होता. यानंतर जखमी सैनिकाला नागपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. आज सकाळी त्‍यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.  

त्यांच्या पश्चात्य आई, वडील, पत्‍नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. बुधवारी सकाळी कोळींद्र या गावी त्‍यांचा मृतदेह आणण्यात येणार आहे.