Sun, Feb 17, 2019 09:50होमपेज › Kolhapur › शिवाजी पुलावर पोलिस आणि नागरिकांच्यात बाचाबाची (व्हिडिओ)

शिवाजी पुलावर पोलिस आणि नागरिकांच्यात बाचाबाची (व्हिडिओ)

Published On: Jan 27 2018 12:56PM | Last Updated: Jan 27 2018 12:56PMकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर काल रात्री ११.३० च्या सुमारास टॅम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी आहेत. कोल्हापूरच्या ऐतिहासिक शिवाजी पूलाने कधीच इतक्या मोठ्या अपघाताची भीषणता अनुभवली नव्हती. रात्री झालेल्या या अपघातग्रस्तांच्या बचावकार्याठी अनेक स्थानिक युवक धावून आले. 

अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली आहे. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तर पूलावर बंद करण्यात आलेली वाहतूक लवकर सुरू करावी यासाठी पोलिस आणि नागरिकांमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी रात्रीच अपघातस्थळी दाखल झाले होते. पुन्हा नव्याने पूलाचा कठडा बांधण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. आता दुचाकी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.